न्यूझीलंडमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीसह नववर्षाचं सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ - नवीन वर्षाचं सेलिब्रेशन
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 31, 2023, 5:38 PM IST
ऑकलंड (न्यूझीलंड) New Year Celebration : न्यूझीलंडचं सर्वात मोठं शहर ऑकलंडमध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि लाइट शोने नवीन वर्ष २०२४ चं स्वागत करण्यात आलं. या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये संपूर्ण शहर सजलेलं दिसतंय. जगात नववर्षाचं स्वागत करणार हे पहिलं मोठं शहर आहे. घड्याळात रात्रीच्या बाराचे ठोके पडताच येथील आयकॉनीक तामाकी मकौरौ टॉवरवर पाच मिनिटं फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. या फटाक्यांच्या प्रदर्शनाचं नियोजन सहा महिन्यांपूर्वीच सुरू झालं होतं. न्यूझीलंडच्या बहुतांश भागात खराब हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र असं असूनही येथे मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. मध्य प्रशांत महासागरातील किरिबाती हा देश जगात सर्वात प्रथम नवीन वर्षाचे स्वागत करतो.