ठाण्यात गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न, पाहा व्हिडिओ - मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न
🎬 Watch Now: Feature Video

ठाणे ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने NCP Youth Congress गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल Gujarat Chief Minister यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाणे नगर पोलिसांनी हा पुतळा जप्त केला आहे. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील झटापट झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या घशात घालणाऱ्या प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत शिंदे-फडवणीस सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्याकडून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, महाराष्ट्राचे प्रकल्प पळवणार्या गुजरातचा निषेध म्हणून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल bhupendra patel यांचा पुतळा जाळण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST