Amol Kolhe On Narendra Modi : सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? अमोल कोल्हेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल - Amol Kolhe will attack the Modi government

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Aug 10, 2023, 3:55 PM IST

Updated : Aug 10, 2023, 4:13 PM IST

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे ( NCP MP Amol Kolhe ) यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका ( Amol Kolhe criticizes Modi government ) केली आहे. मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्तावावर बोलताना कोल्हे यांनी अर्थव्यावस्थेवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशाची संपत्ती काही उद्योगपतींच्या हातात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, देशात बेरोजगारीने कळस गाठल्याचे देखील कोल्हे म्हणाले. किसान सन्मान निधी योजना लागू  करण्यात आली. मात्र शेतीसाठी लागणारे साहित्य महाग झाल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. सरकारची कार्यपद्धती पाहून गांधीजींच्या तीन माकडांची गोष्ट आठवते. सरकारविरुद्ध काहीही ऐकू नका, निवडणुका सोडून देशाची परिस्थिती पाहू नका, तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज बंद करा, असे म्हणत त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर तोशेरे ओढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मात्र त्याच टिळकांनी म्हटल्याप्रमाणे आताची परिस्थिती पाहिली तर, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर प्रहार केला आहे. 

Last Updated : Aug 10, 2023, 4:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.