Sandeep Kshirsagar On Sharad Pawar Meeting : बीडची सभा ऐतिहासिक होणार, लोक उस्फुर्तपणे सभेसाठी येत आहेत - संदीप क्षीरसागर - शरद पवार
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-08-2023/640-480-19286875-thumbnail-16x9-beed.jpg)
बीड : बीडमध्ये आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा होणार आहे. बीडची ही सभा ऐतिहासिक होणार आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये चीड आहे. त्यामुळे उत्स्फुर्तपणे लोक सभेसाठी येत आहेत, अशी प्रतिक्रिया आजच्या सभेचे संयोजक व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. ही सभा कोणालाही कोंडीत पकडण्यासाठी नाही, असे ते म्हणाले. बीडमध्ये शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सभेच्या अनुषंगाने संयोजक संदीप क्षीरसागर यांनी या सभेमध्ये कोण कोण उपस्थित राहणार आहेत, आजची सभा कशी असणार आहे या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पक्षात फूट पडल्यानंतर बीडमध्ये त्यांची ही पहिलीच सभा आहे.