उद्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेची सुनावणी - राष्ट्रवादी कॉंग्रेस

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 9:34 PM IST

मुंबई NCP MLA Disqualification : राज्यात सत्तानंतर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष समोरील शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा निर्णय लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. (Nationalist Congress) शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी गुरुवारी होणार आहे. (Vidhan Sabha Speaker) शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारी पर्यंत द्यायचा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेचा निर्णय 31 जानेवारीला घेण्याचे आव्हान विधानसभा अध्यक्षांपुढे असणार आहे. (Rahul Narvekar)

अजित पवार गटाकडून एक महिन्याची मुदत : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावल्या होत्या. दोन्ही गटांना 5 डिसेंबरला विधिमंडळाकडून नोटीस पाठवित एका आठवड्यात उत्तर देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शरद पवार गटाने नोटीसला उत्तर दिले असून अजित पवार गटाने उत्तरासाठी एका महिन्याची मुदत मागितली होती. (ShivSena MLA Disqualification)

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.