Sharad Pawar News: काही प्रश्नावर वेगळी मते असली तरी, एका विचाराने काम करणार- शरद पवार - उद्धव ठाकरे
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : मंगळवारी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व्हा शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर बैठक झाली. या बैठकीत नेमके काय झाले, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असताना आज शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, आम्ही राज्याच्या राजकारणात एकत्र काम करत आहे. काही प्रश्नावर वेगळी मते असली तरी महाविकास आघाडीत जेवढे पक्ष आहे. त्यांनी एका विचाराने काम करावे. यावर आमची चर्चा झाली असल्याचे यावेळी पवार म्हणाले. मंगळवारी मुंबई येथील बैठकीनंतर आज पवार पुण्यातील त्यांच्या मोदीबाग येथील निवासस्थानी आले होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पुढे महाविकास आघाडीचे काही कार्यक्रम ठरले आहे. यात सर्वांनी एकत्र काम करावे, तसेच एकत्र यावे हे देखील ठरले आहे. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री तसेच स्वातंत्रवीर सावरकर आणि अदानी यांच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद दिसून येत आहे. मंगळवारी झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.