Karnataka Assembly Elections: कर्नाटकने दाखवून दिले लक्ष विचलित करणारे राजकारण चालणार नाही -प्रियंका गांधी - karnataka election result 2023 news
🎬 Watch Now: Feature Video
शिमला (हिमाचल प्रदेश) : कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रचंड यशावर काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की हिमाचल आणि कर्नाटकच्या जनतेने हे सिद्ध केले आहे की, यापुढे लक्ष विचलित करण्याचे राजकारण चालणार नाही. कर्नाटकच्या जनतेने संपूर्ण देशाला हा संदेश दिला आहे की, जनतेला असे राजकारण हवे आहे जे त्यांच्या समस्या सोडवणारे आणि त्यांच्या प्रश्नांवर चालणारे राजकारण आहे. हिमाचलपाठोपाठ काँग्रेसने आपली प्रचाराची पद्धत कर्नाटकातही कायम ठेवली आहे. देशातील जनतेला त्यांच्या महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यांसारख्या प्रश्नांवर बोलायचे आहे. तसेच, त्यांना विकास हवा आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. तसेच, कर्नाटकातील जनतेने आपले लक्ष त्यांच्या प्रश्नांवर केंद्रित ठेवले आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निकाल आला आहे असही प्रियंका म्हणाल्या आहेत.