NIA Raid In Malegaon: एनआयएची मालेगावमध्ये धाड, पीएफआय संघटनेशी संबंधित एका संशयिताला अटक - Nashik News
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : मालेगावमध्ये आज भल्या पहाटे एनआयएची टीम मालेगावात दाखल झाली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पीएफआय या प्रतिबंधित संघटनेशी सबंधित असलेल्या गुफारान खान या 32 वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन तब्बल 6 तास चौकशी करून सोडून देण्यात आले आहे. याआधी देखील मालेगावात या संघटनेशी सबंध असलेल्या दोघांना अटक करण्यात आली होती. एनआयएच्या पथकाने मालेगावच्या मोमीनपुरा भागात पहाटे छापा मारून पीएफआय या प्रतिबंधित संघटनेच्या एका संशयिताला ताब्यात घेतले होते. या संशयिताची आता एटीएसदेखील चौकशी करणार आहे. त्यामुळे त्याला उद्या मुंबईला बोलविण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. टेरर फंडिंगच्या संशयावरून केंद्र शासनाने पीएफआय या संघटनेवर बंदी घातलेली आहे. या अगोदर काही महिन्यांपूर्वी मालेगावातून एनआयएने दोन संशयिताना ताब्यात घेतले होते. पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. मालेगावमध्ये देखील याचे कार्यालय होते. ते काही महिन्यांपूर्वीच सील करण्यात आले आहे. तरीही या संघटनेचे कामकाज सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.