'तसं' नाही झाल्यास मी भर चौकात फाशी घेईन, संतोष बांगर यांचं विधान - MLA Santosh Bangar
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 11, 2024, 4:29 PM IST
हिंगोली MLA Santosh Bangar : कळमनुरी विधानसभेचे शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर नेहमीच या ना त्या कारणानं चर्चेत असतात. (Shinde Group) आज त्यांनी एक घोषणावजा नवीन चॅलेंज केलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार. तसं नाही झाल्यास स्वतः भर चौकात फाशी घेणार असल्याचं चॅलेंज त्यांनी केलं आहे. (Lok Sabha Election 2024) त्यामुळे पुन्हा एकदा संतोष बांगर चर्चेत आले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वतीनं देण्यात येणारा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूनेच लागेल असं छातीठोकपणे सांगितलं होतं. (PM Narendra Modi) आपलं ते विधान शंभर टक्के सत्य ठरल्याचं देखील आमदार संतोष बांगर यांनी मीडियाला सांगितलं. लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष हा विजयाची दावेदारी ठोकत आहे. त्यात भाजपा आणि शिंदे गटसुद्धा मागं नाहीत.