Nagpur RSS Dasra Melava : शंकर महादेवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना गाणार, विजयादशमी उत्सवात विशेष उपस्थिती; म्हणाले... - सरसंघचालक डॉ मोहन भागवत
🎬 Watch Now: Feature Video


Published : Oct 24, 2023, 12:09 PM IST
|Updated : Oct 24, 2023, 1:39 PM IST
नागपूर Nagpur RSS Dasra Melava : आज (24 ऑक्टोबर) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पारंपरिक विजयादशमी उत्सव याहीवर्षी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संगीतकार आणि गायक पद्मश्री शंकर महादेवन यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना शंकर महादेवन यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आभार मानले. तसंच यावेळी त्यांनी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात शस्त्रपूजनाचे विशेष महत्त्व असते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रेशीमबाग मैदानावर या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवकांसह संघाकडून निमंत्रित केलेल्या पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.