Viral Video News : वांद्रे बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात फोटो काढताना जोडपे दंग, मुलाने सावध करूनही दुर्लक्ष केल्यानंतर घडला धक्कादायक प्रकार - Bandra Bandstand
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : पतीबरोबर फोटो काढणारी महिला वांद्रे बॅण्डस्टॅण्ड मुंबईतील समुद्रात वाहून गेली आहे. येथील खडकांवर बसून फोटो काढणे तुमच्या जिवाशी येऊ शकते. अशीच एक घटना आज घडली आहे. यात एक 32 वर्षीय महिला समुद्रात वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिला ही आपल्या कुटुंबासोबत आऊटिंगसाठी वांद्रे बॅण्डस्टॅण्डला आली होती. येथील समुद्र किनारी असलेल्या खडकावर आपल्या पतीसोबत बसून फोटो घेत होती. परंतु फोटो घेणे त्यांना महागात पडले. फोटो घेत असताना त्यांच्या पाठीमागून समुद्राच्या लाटा उसळी घेत होत्या. दोघेही उंच लाटांमध्ये फोटो घेत असताना मागून येणाऱ्या समुद्राच्या लाटांनी महिलेला समुद्रात ओढून घेतले. महिला समुद्राच्या लाटात वाहून जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचे साक्षीदार असलेल्या उपस्थितांनी पोलिसांना बोलावले. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. या व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेबाबत ईटीव्ही भारत कोणतीही पुष्टी देत नाही.