Mumbai Rains: संरक्षक भिंत कोसळल्याने नाल्याजवळचा रस्ता खचला; वाहतूक वळविली
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : सोमवारी रात्री गोरेगाव आयटी पार्कजवळ, संरक्षक भिंत कोसळल्याने नाल्याजवळचा रस्ता खचला आहे. परिसरात बॅरिकेड करण्यात आले आहे. बेस्टच्या बस मार्गांसह वाहने तातडीने वळवण्यात आली आहेत. बीएमसी नुकसानीची तपासणी करेल आणि त्यानंतर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करेल, असे एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेत कोणलाही दुखापत झाली नाही. गोरेगाव पूर्वेतील नागरी निवारा परिषद येथील इन्फिनिटी रोड, आयटी पार्क येथे रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. या भागाजवळील नाल्याची एक संरक्षक भिंत अचानक कोसळली. त्यामुळे रस्ता खचला. परिसरात उभा असलेला एक टेम्पो त्यात पडला. पी नॉर्थच्या वॉर्ड अधिकाऱ्यांसह वाहतूक आणि मुंबई पोलिसांनी या परिसरात नाकेबंदी केली. या घटनेमुळे दिंडोशीत वाहतूक कोंडी झाली होती. आमच्या अभियंत्यांनी क्रेनची व्यवस्था करून टेम्पो उचलला आहे. आम्ही जागेची तपासणी केली आहे. दुरुस्तीचे काम ताबडतोब पार पाडू, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.