MRF Supercross Competition: नाशिककरांनी अनुभवला वेगवान बाईकचा थरार; एमआरएफ सुपर क्रॉस स्पर्धेत झाली अटीतटीची लढत - वेगवान बाईकचा थरार

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 8, 2023, 1:19 PM IST

नाशिक : एमआरएफ सुपर क्रॉस स्पर्धा नाशिकच्या ठक्कर डोम मैदानावर आयोजित करण्यात आली होती. एस एक्स वन या विदेशी बनावटीच्या मोटरसायकलीच्या गटात अटीतटीची लढत बघायला मिळाली. ही स्पर्धा एकूण नऊ गटात पार पडली. यात एकूण 80 स्पर्धक सहभागी झाले होते. अटीतटीच्या झालेल्या स्पर्धेत टीव्हीएस पेट्रोनास टीमचा प्रज्वल विश्वनाथ यांनी विजेतेपद पटकावले. तर क्लास वन एस एक्स 2500 सीसीमध्ये प्रज्वल प्रथम, ऋग्वेद बारगुजे द्वितीय आणि श्लोक घोरपडे याने तृतीय पारितोषिक पटकावले. क्लास टू एस एक्स 2500 या विभागात श्लोक घोरपडे प्रथम, प्रणव बी के द्वितीय, जय जाधव तृतीय ठरला. क्लास फोर लोकल 260 सीसीमध्ये राजेश स्वामी प्रथम, पुष्कर घोरपडे द्वितीय, पीनेश ठक्कर हा तृतीय विजयाचा मानकरी ठरला. या स्पर्धेत दोन पाच वर्षीय स्पर्धकांच्या सहभागामुळे उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त करत त्यांचे कौतुक केले. ही स्पर्धा बघण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. या स्पर्धेमुळे नाशिककरांनी वेगवान बाईकचा थरार अनुभवला आहे. 

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.