Watch Video : नग्न महिलांचा व्हिडिओ अधिवेशनापूर्वी जाणूनबुजून व्हायरल केला - नवनीत राणा - नवनीत राणा यांचे लोकसभेत भाषण
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली : विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत आपली बाजू मांडली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर कठोर शब्दात टीका केली. मणिपूरमधील नग्न महिलांचा व्हिडिओ हेतुपुरस्सर व्हायरल करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. मे महिन्यात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ जुलै महिन्यात अधिवेशनापूर्वीच का व्हायरल झाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मणिपुरातील घटनेबाबत चिंता व्यक्त करणारे विरोधक राजस्थानमधील घटनेबाबत मात्र गप्प आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. जर विरोधकांना महिलांची इतकीच काळजी आहे तर मग विरोधकांचे प्रतिनिधी मंडळ ४ मे रोजीच मणिपुरात का गेले नाही, असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला आहे. जुलै महिन्यात अधिवेशन सुरू झाल्यानंतरच विरोधक मणिपुरात का गेले, असे नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.