Navneet Rana अजामिनपात्र वॉरंट काढताच नवनीत राणा म्हणतात न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार - शाळा सोडल्याचा दाखला खोटा सादर केल्याचा आरोप
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - जात पडताळणी प्रकरणात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या विरोधात कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट काढले आहे. खासदार नवनीत राणा यांनी मात्र सध्या ज्या काही बातम्या येत आहेत, त्यात काही एक तथ्य नसल्याचे म्हटले आहे. आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे सातत्याने पालन केले आहे. यापुढे देखील न्यायालयाचे आदेश पाहणार असे म्हटले आहे. जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांच्यावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला खोटा सादर केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात कलम 420, 468, 471, 34 अन्वये गुन्हा दाखल आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यावरच बोलण्यात अर्थ आहे. सध्या प्रकरण न्यायालयात आहे आणि अद्याप न्यायालयाचा स्पष्ट निर्णय आलेला नाही. त्यामुळे न्यायालयाचा स्पष्ट निर्णय आल्यावरच या विषयावर मी बोलेल असे देखील खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST