Navneet Rana On Owaisi : महाराष्ट्रात औरंगजेबाच्या घोषणा चालणार नाहीत, नवनीत राणांचा ओवेसींवर पलटवार - उद्धव ठाकरेचे सरकार नाही
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती : आयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बुलडाणा येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेत औरंगजेबाच्या नावाने कथित घोषणाबाजी केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देताना ओवैसी यांच्यावर टीकास्त्र सोडले. तर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया देताना ओवैसींना थेट इशारा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून असुद्दीन ओवेसी येथे येऊन महाराष्ट्रातील जनतेला भडकवण्याचे काम करत आहेत. त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. इथे उद्धव ठाकरेंचे सरकार नाही. येथील सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालते. औरंगजेबाच्या घोषणा आणि प्रक्षोभक भाषणे महाराष्ट्रात अजिबात चालणार नाहीत. नवनीत राणा यांनी एक व्हिडीओ जारी करत ओवैसींना लक्ष्य केले आहे. तसेच महाराष्ट्रात ओवैसींचे भडकाऊ भाषण आणि औरंगजेबाच्या घोषणा चालणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि त्यानंतरच महाराष्ट्रात येण्याची हिंमत दाखवावी. असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.