Hemant Patil warns Tehsildar: लोकांचे प्रश्न कळत नाही का? म्हणत खासदार हेमंत पाटील यांनी माहूरच्या तहसीलदारांना धरले धारेवर..पहा व्हिडिओ - हेमंत पाटील
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड : जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यातच किंनवट, माहूर या भागात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या भागात सर्वाधिक शेतीचे नुकसान झाले आहे. पण, प्रशासन योग्य काम करत नसल्याच्या तक्रारी येत आहे. माहुरचे तहसीलदार किशोर यादव यांच्याबाबत अनेकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या. त्या तक्रारींमुळे पारा चढलेल्या खासदार हेमंत पाटील यांनी तहसीलदारांना धारेवर धरले. तू काय ब्रिटीशांची औलाद आहेस का? लोकांचे प्रश्न कळत नाहीत का? मस्ती चढली आहे का? असे म्हणत त्यांनी तहसीलदारांना झापणे सुरू केले. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहूरच्या नुकसानीबाबत माहिती घेत असताना त्यांनाही तू तुझाच शहानपणा शिकवतोस का? अशा विविध कारणांवरून खासदार हेमंत पाटील यांनी तहसीलदारांना सुनावले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. खासदार हेमंत पाटील हे या भागाच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. त्यांनी माहूर तालुक्यातील सातघरी, शेकापूर, लांजी. टाकळी, मच्छिन्द्रपार्डी या गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला. तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शासनाला त्वरित अहवाल पाठवा, अशा सूचना तहसीलदारांना केल्या. यावेळी योगी श्यामबापू भारती महाराज, तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, युवासेनेचे तालुका प्रमुख विकास कपाटे, हनुमंत मुंडे, सुरज सातूरवार, साई पापेलवार, समीर जायभाये यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.