Morning Walk Issue: मॉर्निंग वॉकला न आल्याने मित्र पोहोचले बँड बाजासह; व्हिडिओ व्हायरल... - Band Baja For Morning walk

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 5:34 PM IST

Updated : Nov 3, 2023, 6:16 PM IST

बुलडाणा Morning Walk Issue: बुलडाण्यात मागील तीन दिवसांपासून नियमित आपल्या सोबत मॉर्निंग वॉकला येणारा मित्र न आल्याने त्याला नियमित मॉर्निंग वॉक करता सवय ठेवण्याकरिता बाकीचे मित्र बँड बाजासह त्याच्या घरी पोहोचले (Arriving at friend house with band). या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याची चर्चा देखील होत आहे. (unique trick to wake up friend) मॉर्निंग वॉक म्हटलं की काही दिवस तो सुरू होतो व नंतर लॉक होतो. मॉर्निंग वॉक हे आरोग्यासाठी लाभदायी असते. (Band Baja For Morning walk) पण अनेक जण थंडीमुळे म्हणा किंवा झोप पूर्ण होत नसल्यामुळे सकाळी उठण्यास मागेपुढे पाहतात. असाच प्रकार काही जणांच्या एका मित्रासोबत झाला असावा. त्याने मॉर्निंग वॉक करता तीन दिवसांपासून दांडी मारल्यानंतर त्याला नियमित मॉर्निंग करता यावं या करता चक्क ही अभिनव शक्कल लढविण्यात आली. यामध्ये मॉर्निंग वॉकला बुट्टी मारणाऱ्या मित्राच्या घरी काही मित्र चक्क बॅंडबाजा घेऊनच पोहोचले. सध्या हा विषय चर्चेचा झाला आहे.

Last Updated : Nov 3, 2023, 6:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.