Monsoon Update: प्रतीक्षा संपली; 48 तासात केरळमध्ये मान्सून होणार दाखल - 3 ते 4 दिवसात मान्सून राज्यात दाखल होणार
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : राज्यात दरवर्षी मान्सूनला 7 जून रोजी सुरवात होत असते. पण यंदा मान्सूनला उशिरा सुरवात होणार असल्याचे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अश्यातच आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. पुढील 48 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान तज्ञ कृष्णानंद होसळीकर यांनी ही माहिती दिली आहे. हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून कधी दाखल होईल हे याआधी सांगितले होते. पण आत्ताची परिस्थिती पाहता पुढील 48 तासात केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. त्याच्या पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून राज्यात दाखल होणार आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन देखील केले की, पेरणीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी घाई करू नये. पाऊस जरी सुरुवातीला झाला तरी कृषी विभागाच्या संपर्कात शेतकऱ्यांनी राहवे असे होसळीकर यांनी सांगितले.