MLA Yashomati Thakur 2024 मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता येईल- आमदार यशोमती ठाकूर - राज्यात काँग्रेस पुन्हा एकदा भरारी घेणार

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 25, 2022, 8:06 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

MLA Yashomati Thakur अहमदनगर काँग्रेसचा विचार हा सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात पुन्हा काँग्रेस पक्ष मजबूत होणार असून त्यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर तालुक्याने राज्याला सर्वांगीण विकासाचा संस्कार दिला असल्याचे प्रतिपादन माजी महिला व बालकल्याण विकासमंत्री आमदार यशोमती ठाकूर Child Welfare Development Minister MLA Yashomati Thakur यांनी केले आहे. संगमनेर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात वा हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात आयोजित मथुरागिनी महिला मेळाव्यात त्या बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात MLA Balasaheb Thorat हे होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, सत्यजित तांबे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाले की थोरात परिवार हा संस्कारशील परिवार आहे. सर्वांचे आदर गोरगरिबांचा सन्मान ही थोरात परिवाराची ख्याती आहे. या परिवारावर संगमनेर तालुक्याने भरभरून प्रेम केले असून आमदार बाळासाहेब थोरात MLA Balasaheb Thorat यांनी तालुक्याचे नेतृत्व करताना संगमनेरच्या रचनात्मक विकासाचा संस्कार राज्याला दिला आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेसाठी अत्यंत चांगले काम केले. आपण अंगणवाडी सेविकांसाठी 15000 रुपये व मदतनीस यांच्याकरता 12000 रुपये मानधन मंजूर केले. मात्र सध्याच्या खोके सरकारने या मानधनाला स्थगिती दिली आहे. सध्या आलेले हे अचानक सरकार हे स्थगिती सरकार आहे. संगमनेर तालुक्यातही काही उपद्रव्य शक्ती त्रास देऊ शकतात. मात्र आमदार थोरात यांचे नेतृत्व खंबीर असून जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे. काँग्रेसचा विचार हा शाश्वत असून खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भाजपा घाबरले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.