MLA Strike for maratha reservation : मंत्रालयासमोरच आमदारांचं उपोषण सुरू; आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी - लक्षणिक उपोषणाला सुरुवात
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/31-10-2023/640-480-19902805-thumbnail-16x9-mumbai.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Oct 31, 2023, 4:37 PM IST
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आमदार, खासदारही आक्रमक झालेत. आज मंत्रालय येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीन आमदारांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी आमदार, खासदारांनी राजीनामे दिल्यानंतर आता मुंबईत सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक होत असताना, मराठा आरक्षणासाठी तीन आमदार आक्रमक झाले आहेत. मंत्रालय येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार निलेश लंके, कैलास पाटील, राजू नवघरे या तीन आमदारांनी मंत्रालयाबाहेर लक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा आणि मराठा आरणक्षाचा प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी या तीन आमदारांनी केली आहे. मंत्रालयाच्या समोरच या आमदारांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाचं हत्यार उपसलं असल्यामुळं मुख्यमंत्री आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणता निर्णय घेतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.