Yashomati Thakur Reaction on Anil Bonde Statement : डॉ. अनिल बोंडे यांच्या डोक्यात फरक पडला : यशोमती ठाकूर - अमरावती शहर आणि जिल्ह्यात दंगली
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - जिल्ह्यातील लोकांना भडकवण्याचे काम डॉ. अनिल बोंडे करत आहेत. सुशिक्षित माणूस, असा वागत नाही त्यांच्या डोक्यात फरक पडला आहे. स्वतःच्या मुलांना विदेशी पाठवून येथील जनसामान्यामध्ये अस्वस्थता निर्माण करायची असा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. डॉक्टर असणाऱ्या व्यक्तीला असे वागणे शोभत नाही, अशी टीका करत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी डॉ. अनिल बोंडे यांना प्रत्युत्तर दिले आहे. अमरावतीत सलोख्याचे वातावरण आहे हे असे चांगले वातावरण टिकवून ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे म्हणत शांतता राखण्याचे आवाहन यशोमती ठाकूर( Minister Yashomati Thakur ) यांनी केले आहे. गत काही दिवसांपासून अमरावती शहर आणि जिल्ह्यात दंगली होत आहेत, तर अनेक भागांत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. या अशा परिस्थितीच्या मास्टर माईंड जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर याच आहेत, असा आरोप ( Amravati riots Anil Bonde Allegations ) भाजप नेते आणि माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे ( Amravati riots Anil Bonde reaction ) यांनी केला होता. त्या आरोपाला प्रत्युत्तर देताना मंत्री ठाकूर यांनी बोंडे यांच्यावर टीकास्त्र ( Yashomati Thakur Reaction on Anil Bonde Statement ) सोडले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST