MIM On Sambhaji Bhide : महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; एमआयएमने केला संभाजी भिडेंचा निषेध - महात्मा गांधीच्या पुतळ्याला अभिवादन
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर : सोलापूर शहर एमआयएमच्या स्थानिक नेत्यांनी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचा निषेध केला आहे. सोलापूर रेल्वे स्थानकासमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करत दुग्धभिषेक करण्यात आला. यावेळी एमआयएमच्या महिला नेत्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यास पुढाकार घेतला होता. संभाजी भिडेंवर कारवाई केली नाही, राज्य शासनाने बघ्याची भूमिका न घेता कठोर कारवाई करावी. तसेच भिडेंना राज्य शासन जी सुरक्षा देत आहे ती सुरक्षा काढावी अशी मागणी, एमआयएमच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. यावेळी दुग्धाभिषेक करण्यासाठी एमआयएम नेत्यांनी 51 लिटर दूध आणल्याची माहिती, कोमारु सय्यद यांनी दिली. संभाजी भिडे हे असे अपमानास्पद शब्द बोलत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार मूग गिळून गप्प का? असा प्रश्न एमआयएम नेत्यांनी उपस्थित केला. यावेळी महिला नेत्या सलमा सय्यद, नासीमा कुरेशी, वाहिदा भांडालेसह पालेखान पठाण, अजहर हुंडेकरी, अशापक बागवान, राजा बागवान, अनिसा डोका, मुश्ताक कानकुर्ती, सचिन कोलते, बंडूभाऊ जाधव आदी उपस्थित होते.