Medha Patkar : संविधानाच्या रक्षणासाठी 'नफरत छोडो संविधान बचाओ जनसंवाद यात्रा' - मेधा पाटकरांची - मेधा पाटकर
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : द्वेष भावनेने नफरतचे विष समाजात पसरवून वोट बँकेला जातीशी जोडले जात असून हे चुकीचे आहे. संविधानाचे रक्षण करीत ही नफरत कमी करून सर्व समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यासाठी संविधानाचे रक्षण व्हावे यासाठी 'नफरत छोडो संविधान बचाओ जनसंवाद यात्रा' काढून संपूर्ण देशभर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर Medha Patkar यांनी भिवंडीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 'नफरत छोडो संविधान बचाओ जनसंवाद यात्रा' Nafrat Chodho Constituent Bachao Jan Samswad Yatra या नावाने जागर करीत देशभर विविध 500 जिल्ह्यात यात्रा जाणार असून ठाणे जिल्ह्यात या यात्रेचा शुभारंभ नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर यांच्या शुभहस्ते भिवंडीत करण्यात आला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. या प्रसंगी मोठ्या संख्येने सर्वधर्मीय समाज बांधव उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST