Maya tigress in Tadoba : मायाच्या बछड्याची पर्यटकांना भुरळ; सुप्रिया सुळेंनी देखील केला व्हिडिओ शेअर - maya tigress with cub
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर : ताडोबातील माया वाघीणीची ( Maya tigress in Tadoba ) माया पर्यटकांनी मनसोक्त अनुभवली. सकाळच्या फेरीत पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना वाटेतच माया वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या बछड्यासह कोवळ्या उन्हात उभी असलेली दिसली. हा व्हिडीओ त्वरित व्हायरल झाला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule ) यांनी देखील आपल्या फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 1 ऑक्टोबर पासून ताडोबा आंधळी व्याघ्र प्रकल्प पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. यादरम्यान पर्यटकांचा आकर्षण असलेली माया वाघीण आणि तिच्या बछडा याची सर्वत्र चर्चा आहे. आज माया वाघीण आणि तिच्या चिमुकल्या बछड्यासह अनेक पर्यटकांना तिचे दर्शन झाले. ती आपल्या पिलासह खेळत असताना पर्यटकांचे आगमन झाले आणि कॅमेराचा खळखळ आवाज सुरू झाला. यामुळे विचलित झालेली ही वाघीण आपल्या पिलाला जबड्यात उचलून जंगलात निघून गेली. मुलांच्या संदर्भात संवेदनशील असलेली आई यानिमित्ताने दिसून आली. पिलांची सुरक्षितता ही तिच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे या प्रसंगातून दिसून आले. मायाचे हे रूप पर्यटकांनाही सुखावून गेले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST