Ahmednagar March आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात लव्ह जिहादच्या विरोधात अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा - Upper Superintendent of Police office

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 10, 2022, 5:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

अहमदनगर Ahmednagar March जिल्ह्यातील श्रीरामपूर आता लव्ह जिहादच्या प्रकरणांमुळे March against Love Jihad चर्चेत आले आहे. एका आदिवासी तरुणाने मुस्लिम मुलीशी लग्न केले म्हणून त्याचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याचा घातपात झाल्याचा संशयही कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असले तरी, त्या तरुणाचा अद्याप तपास लागलेला नाही. हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण विधिमंडळातही गाजले होते. याप्रकरणी श्रीरामपूर येथील मुल्ला कटर याच्यासह, आणखी काही आरोपींना अटक झाली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनाही निलंबित करून चौकशी सुरु आहे. हा प्रश्न विधानसभेत मांडताना आमदार नितेश राणे यांनी हिंदू मुलींचे धर्मांतर घडवून विवाह करण्यासाठी, मुस्लिम तरुणांना पैसा पुरविला जात असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी आज आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली led by MLA Nitesh Rane श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चा काढण्यात आला असून; महात्मा गांधी पुतळा ते अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर Upper Superintendent of Police office हा मोर्चा धडकला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.