Maratha Reservation Row : सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोडीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया, काय म्हणाले पाहा व्हिडिओ - मुंबईत गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 26, 2023, 12:32 PM IST
जालना Maratha Reservation Row : मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्यानं राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. यावर गुणरत्न सदावर्तेंनी प्रतिक्रिया देत सरकारनं मनोज जरांगे पाटलांचे लाड बंद करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर मनोज जरांगे पाटलांनी या तोडफोडीचं आम्ही समर्थन करत नसल्याचं म्हटलंय. तसंच हा प्रकार मला माहीत नाही, आमच्याकडून शांततेत आंदोलन सुरू असल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलंय. गुणरत्न सदावर्ते यांनी यापूर्वीही मराठा आरक्षणावरुन जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी केली होती. यानंतर गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाजाकडून ठिकठिकाणी आंदोलनही करण्यात आलं होतं. अशातच काल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईत गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती.