Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा विषय महिन्याभरात मार्गी निघेल- चंद्रकांत पाटील - माजी आमदार चंद्रकांत मोकाटे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 14, 2023, 1:00 PM IST
पुणे Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय गाजत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाच्या बाबतीत 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तसंच ते आता राज्यभर दौरादेखील करणार आहेत. मराठा आरक्षणा संदर्भात उपसमितीचे अध्यक्ष तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, मी उपसमितीचा अध्यक्ष म्हणून जो सर्वांशी संवाद करतोय. आमची पूर्वतयारी पाहता मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या महिन्याभरात मार्गी लागेल. ठाकरे गटाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या वतीनं आज (14 नोव्हेंबर) दिवाळी फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला विविध पक्षातील नेते मंडळी उपस्थित होते. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावली.