मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सभा संपल्यानंतर केलं रुग्णालयात दाखल - मराठा आंदोलनासाठी उपोषण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/12-12-2023/640-480-20245707-thumbnail-16x9-maratha-reservation-protest.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Dec 12, 2023, 2:05 PM IST
बीड Maratha Reservation Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंबाजोगाईतील अंबासाखर कारखाना इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सभा सुरू असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना सभा संपल्यानंतर अंबाजोगाईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्राथमिक उपचार केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं सभेसाठी दौऱ्यावर असल्यानं त्यांना अशक्तपणा आला आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती मराठा आंदोलन समन्वयकांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सातत्यानं मराठा आंदोलनासाठी उपोषण केलं आहे. त्यामुळे त्यांचं ब्लडप्रेशर कमी अधिक होत असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं. डॉक्टरांनीही मनोज जरांगे पाटील यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र मनोज जरांगे पाटील सभा घेण्यावर ठाम राहिल्यानं बीडमधील सभा पार पडली. मात्र सभेनंतर त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.