Chandrashekhar Bawankule : मराठा समाज आक्रमक; चंद्रशेखर बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे - बावनकुळेंना मराठा समाजाकडून काळे झेंडे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 28, 2023, 10:18 PM IST
ठाणे Chandrashekhar Bawankule : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी कल्याणमधील टिळक चौकात जनतेशी संवाद साधला. यानंतर मोदी मोदीच्या घोषणेत ते स्टेजवर जाताच मराठा समाजाच्या वतीनं त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला. यावेळी 'गो बॅक बावनकुळे' आणि 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा मराठा कार्यकर्त्यानी दिल्या. अचानक झालेल्या या निषेधामुळे आंदोलनकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली. पोलिसांनी वेळीच तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना बाजुला करत बाजारपेठ पोलीस ठाण्यात (Bazarpeth Police Station) नेल्याचं सांगितलं.
कार्यकर्ते झाले आक्रमक : विशेष म्हणजे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) हे उपस्थित होते. हा सर्व गोधंळ पाहून भाजपाच्या कार्यकत्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर होते. मात्र, शेवट्याच्या टप्प्यातील कार्यक्रमात अचानक मराठा समाजाचे कार्यकर्ते मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.