Maratha Reservation: १०० एकरवर मनोज जरांगे पाटील घेणार संवाद सभा, पहा व्हिडिओ - मनोज पाटील जरांगे
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 27, 2023, 11:04 PM IST
जालना Maratha Reservation: 14 ऑक्टोंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराठी येथे मनोज पाटील जरांगे (Manoj Patil Jarange) यांनी मराठा समाजाला (Meeting of Manoj Jarange) आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. यानंतर या उपोषणादरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण स्थळी येऊन समाजाला 40 दिवसांचा वेळ मागून घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. याचा कार्यकाळ संपत आला आहे. तरी शासनाकडून कुठलाच ठोस (Maratha Samaj Sabha ) निर्णय मराठा आरक्षणावर घेण्यात आलेला नाही. यामुळे राज्यातील सर्व मराठा बांधवांचे लक्ष लागून राहिले आहे. समाजासोबत संवाद साधणे गरजेचे असल्याने मनोज पाटील जरांगे 14 ऑक्टोबर रोजी भव्य सभा घेणार आहेत. शंभर एकरावर ही सभा घेण्यात येणार असल्याने या सर्व जागेची पाहणी मराठा आंदोलनकर्ते मनोज पाटील जरांगे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.