राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष वेदनादायक - छत्रपती संभाजीराजे - मराठा आरक्षणाचा मुद्दा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 10:48 PM IST

अहमदनगर Maratha Reservation Issue : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण होतोय. (Maratha vs OBC conflict) त्यात नेत्यांच्या वक्तव्यामुळे ओबीसी आणि मराठा समाजात दुरावा आला आहे. (Chhatrapati Sambhajiraje) आपण सर्व एका छत्राखाली राहणारे असून यामुळे आपल्याला वेदना होत असल्याची खंत छत्रपती संभाजी राजेंनी संगमनेरमध्ये व्यक्त केलीय. इंदापूरमध्ये पडळकरांवर चप्पल फेकण्यात आली होती. अशा गोष्टी होऊ नये. हे अशोभनीय असल्याचं छत्रपती संभाजी राजेंनी म्हटलं. ते अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Chhatrapati Sambhajiraje visit Sangamner)

प्रकृती खराब असतानाही उपोषणस्थळाला भेट : मराठा आरक्षणाची मागणी घेऊन गेल्या 25 ऑक्टोबर पासून सकल मराठा समाजाच्या वतीनं संगमनेर बस स्थानकासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज 47 वा दिवस असल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी सायंकाळी उपोषणकर्त्यांची भेट घेतलीय. दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांचे संगमनेर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. छत्रपती संभाजीराजे यांची प्रकृती खराब असतानाही संगमनेर येथे सुरू असलेल्या उपोषण स्थळाला त्यांनी आज भेट दिली. प्रकृती खराब असल्याने यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी जास्त बोलणे टाळले. (Shirdi Chatrapati Sambhaji Raje)

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.