कुणबी मराठ्यांच्या आतापर्यंत 72 लाख नोंदी सापडल्या आहेत - मनोज जरांगे पाटील - chhagan bhujbal
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 18, 2023, 4:51 PM IST
|Updated : Dec 18, 2023, 5:46 PM IST
जालना : गिरीष महाजनांनी त्यांना येरवाड्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून गोळ्या द्याव्या, ते आता बधिर झालंय, महाजन यांनी भुजबळ यांना बांधून सलाईन टोचावं, अशी टीका मनोज जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर केलीय. काल भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर आज पुन्हा शरसंधान साधलंय. मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या नजरेतून उतरू नये, त्यांनी आज खरं बोलावं असं जरांगे यांनी म्हटलंय. 'त्याला माझं चॅलेंज आहे. मी जन्मल्यापासून आतापर्यंत थेंब भर जरी दारू पिलो असेल तर जिवंत समाधी घेईन नाहीतर त्यांनी तरी समाधी घ्यावी. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे, असंही जरांगे यांनी म्हटलंय. आमच्या नोंदी सापडल्या असेल तर आम्हाला आरक्षण द्यावंच लागेल. मराठ्यांच्या आतापर्यंत 72 लाख नोंदी सापडल्या आहेत असा दावाही जरांगे यांनी केलाय. त्याचं ऐकून धनगर, वंजारी बांधवांनी आम्हाला भांडू नये, आमची नाराजी अंगावर घेऊ नये, असा सल्ला देत जरांगे यांनी भुजबळ यांना टोला हाणला. विरोध जरी केला तरी मराठ्यांना आरक्षण मिळेलच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.