तुमचं राजकीय करिअर बाद व्हायला वेळ लागणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा - Manoj Jarange Patil
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 7, 2024, 6:39 PM IST
बीड Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा अजित पवारांना इशारा देत सडकून टीका केलीय. मराठ्यांच्या विरोधात बोलाल तर तुमचं राजकीय करिअर बाद व्हायला काहीच टाईम लागणार नाही, (Maratha Reservation) असा सणसणीत इशारा मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलाय. (Ajit Pawar) त्याचबरोबर तुम्हीच राज्यातले गुन्हे घडवले हे सिद्ध होत आहे आणि ते उघड देखील होईल, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. (Gopichand Padalkar) आम्ही मराठ्यांना संपवणार, मराठ्यांचे मुडदे पाडायचे हे तुमचे पूर्वीचे विचार आजही आहेत, अशी जहरी टीका देखील यावेळी मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांवर केलीय. तर यावेळी त्यांनी गोपीचंद पडळकरांनी केलेल्या 'अर्धवटराव'च्या टीकेवर बोलणं टाळलं. ते बीडच्या गोदापट्ट्यात मीडियाशी बोलत होते. यापूर्वीही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केलेली होती.