मकर संक्रांतीनिमित्त शिर्डीत आकर्षक सजावट, साई मंदिरात भाविकांची रीघ; पाहा व्हिडिओ - उत्तरायण

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 1:37 PM IST

शिर्डी Shirdi Sai Baba Temple Decoration : आज (15 जानेवारी) सगळीकडे मकर संक्रांतीची धामधूम सुरू आहे. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळं सारेच उत्सुक आहेत. सकाळपासूनच‎ पतंगबाजीला सुरुवात झाली असून संक्रातीच्या या‎ शुभपर्वानिमित्त मंदिरांमध्ये‎ दर्शनासाठी भाविकांची गर्दी हाेत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही आज सकाळपासूनच भाविकांची गर्दी बघायला मिळत आहे. तसंच आंध्रप्रदेशातील साईभक्त डी. लक्ष्‍मी नरसिंहा यांच्‍या देणगीतून मकरसंक्रांत निमित्ताने साई मंदिर आणि तेथील परिसरात फुलांची सजावट करण्यात आलीय. दरम्यान, मकर संक्राती हा वर्षातील पहिला सण देशातील विविध राज्यांमध्ये याला वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. पंजाब आणि हरियाणामध्ये लोहरी, पश्चिम बंगालमध्ये उत्तर संक्रांती, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये उत्तरायण किंवा खिचडी, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमध्ये संक्रांती, तमिळनाडूमध्ये पोंगल आणि आसाममध्ये बिहू म्हणून हा सण साजरा केला जातो. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.