Mahesh Tapase : मुख्ममंत्र्यांच्या खासदार पुत्राची महेश तपासे यांनी उडवली खिल्ली - Srikant Shinde photo goes viral
🎬 Watch Now: Feature Video

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री पदाचा कारभार त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून बसवून चालवतात का? असा प्रश्न उपस्थित करणारा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविकांत वर्पे यांनी ट्विट केला ( MP Shrikant Shinde sited on CM chair ) आहे. त्यानंतर राजकीय स्थरातून या फोटोवर वाद विवादित चर्चा सुरु असतानाच, राष्ट्रवादी प्रदेशचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनीही रामायणातील कथेचा दाखला देत, हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची खिल्ली उडवली ( Mahesh Tapase criticize Srikant Shinde ) आहे. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजारीत चिरंजीव मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांना निर्णय देत असतील तर, हा कुठल्या कुटूंबातील गोष्टीमध्ये प्रवृत्ती निर्माण करतात, त्यामुळे असं वागणं बरं नव्हे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सवालही उपस्थित करून खासदार डॉ, श्रीकांत शिंदेनी महाराष्ट्रातील जनतेसमोर दिलगिरी व्यक्त करावी असा खोचक टोलाही तपासे यांनी ( MP Shrikant Shinde sited on CM chair Photo viral ) लगावला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST