Maharashtra Political Crisis : अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, आता शिंदेंप्रमाणे पक्षावर दावा ठोकणार का?, - शरद पवार
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 8 जेष्ठ नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे या नेत्यांचा समावेश आहे. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आता अजित पवार देखील एकनाथ शिंदेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर दावा ठोकणार का?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे तीन मोठे नेते एकत्र आल्याने त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होते, हे पाहणे देखील महत्वाचे आहे. सध्याच्या घडीला राज्याला प्रथमच अजित पवार व देवेंद्र फडणवीसांच्या रुपात दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत.