आलिशान कारने घेतला मांजरीचा जीव, पाहा ह्रदय हेलावून टाकणारा व्हिडिओ - ठाण्याच्या कॉसमॉस टॉवर
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे: ठाण्याच्या कॉसमॉस टॉवर cosmos tower thane समोरील गेटजवळ एका आलिशान कारने मांजरीला चिरडले. Luxury car claims cats life. कारचालकाच्या विरोधात स्थानिक तरुणाने राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. सदर अपघाताचे सीसीटीव्ही मिळवल्यानंतर ही कार एमएच ०४ जीयू ३००० या व्हीआयपी नंबरची असल्याचे समोर आले आहे. कारचालक रमेश गुप्ता रा. कॉसमॉस मेरी पार्क यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर राबोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अद्याप कारचालकाला अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST