leopard video : पिंजऱ्यात असूनही बिबट्याची दहशत; डरकाळी फोडत नागरिकांवर धावून जाण्याचा प्रयत्न...पाहा व्हिडिओ

By

Published : Aug 9, 2023, 4:37 PM IST

Updated : Aug 9, 2023, 5:16 PM IST

thumbnail

पुणे : अलीकडच्या काळात मानवाने वन्यप्राण्यांच्या हद्दीत अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वन्यप्राणीही शहरात दिसू लागले आहेत. जुन्नर तालुक्यातील अनेक गावात बिबट्या असल्याचे समोर आले आहे. बिबट्या त्याच्या बछड्यांना घेऊन वास्तव्य करत असल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले आहे. अशातच जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील गुंजाळ मळा येथे दहशत माजावणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. एवढेच नाही तर जेरबंद केल्यानंतर देखील बिबट्या नागरिकांच्या अंगावर डरकाळी फोडत धावून जात होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. मात्र बिबट्याला पकडल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तर या भागात अजून दोन तीन बिबटे असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरातील नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Last Updated : Aug 9, 2023, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.