Kirit Somaiya Viral Video : किरीट सोमैयांविरोधात महिला शिवसैनिक आक्रमक; प्रतिमेला शेण लावत केला निषेध - करीट सोमैयाविरोधात महिला शिवसैनिक आक्रमक
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - भाजपा नेते किरीट सोमैया यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्या व्हिडिओवरून विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे. किरीट सोमैया यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात किरीट सोमैया यांच्या प्रतिमेला शेन लावून जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी आक्रमक शिवसैनिकांच्यावतीने किरीट सोमैया यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही लाजीरवाणी बाब आहे. हे किती घाणेरडे वृत्तीचे आहे हे आता सर्व जनतेला समजले आहे. आता भाजपच्या महिला आघाडी तसेच त्यांच्या महिला नेत्या चित्रा वाघ कुठे आहेत? खरंच गृहखाते यावर कारवाई करणार का? तसेच सरकारने याची दखल घेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी शहर संघटिका पल्लवी जावळे यांनी केली आहे.