संतप्त ग्रामस्थांनी गाव काढलं विकायला; गैरसोयींचा पाढा वाचत गाव विक्रीच्या बॅनरबाजीची जिल्ह्यात चर्चा - Khadakwadi Village
🎬 Watch Now: Feature Video


Published : Dec 25, 2023, 7:44 PM IST
बीड Khadakwadi Village : गावात सुविधांसाठी ग्रामस्थ सरपंचांच्या मागे लागतात. तरी देखील सुधारणा न झाल्याने ग्रामस्थ उपोषणाला बसतात. मात्र गावात सुविधा मिळत नसल्यानं संतप्त होत ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचा प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यात घडलाय. खडकवाडी गावात ग्रामस्थांनी गाव विक्रीचे बॅनर लावले आहेत. गावात कसल्याही सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नावाने बॅनर लावले आहे. त्यावर थेट गाव विक्री करण्याची अनुमती मागण्यात ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. गावाच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. शिवाय ग्रामपंचायतीला थेट निधी देखील येत असतो. मात्र १८०० लोकसंख्या असलेल्या गावात शासनाच्या अनेक योजना कागदोपत्रीच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गाव विक्री करण्याचे बॅनर लावल्याने या गावाची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे.