Video: पोलीस अधिकाऱ्याचा मंदिरासमोर जोरदार डान्स, व्हिडिओ व्हायरल; अधिकाऱ्याचे निलंबन - इडुक्की येथील पूपारा उत्सव
🎬 Watch Now: Feature Video
केरळ : केरळमधील इडुक्की येथील मंदिर उत्सवासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटना इडुक्कीच्या पूपारा येथील आहे. अलीकडेच मरियम्मान मंदिरात पूपारा उत्सव झाला त्या दरम्यान हा व्हिडिओ तयार करण्यात आला. शांतनपारा एसआय केपी शाजी आणि त्यांची टीम उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोहोचली होती. दरम्यान, मरियम्मा कालियाम्मा हे तमिळ गाणे ऐकूण एसआयने नाचण्यास सुरुवात केली. डान्स सुरू असताना स्थानिक लोकांनी एसआयला पकडले. स्थानिकांनी काढलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इडुक्कीच्या डोंगराळ भागात, स्थानिक लोक तमिळ संस्कृतीच्या मंदिरांमध्ये उत्सवादरम्यान मरियममनच्या गाण्यांवर नाचतात. पण SI स्वतः थेट घटनास्थळी येऊन डान्स केल्याने स्थानिक लोकांनाही आश्चर्य वाटले. फुटेजमध्ये स्थानिक लोक अधिकाऱ्याला डान्स करण्यापासून रोखत होते. मात्र, ते चांगलेच दंग झाले असल्याने त्यांनी जोरदार डान्स केला. दरम्यान, घटनेचा तपास होईपर्यंत डान्स करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबीत करण्यात आले आहे.