Journey of School Students in Buldhana : शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, वाहनावर लोंबकळत विद्यार्थ्यांना करावा लागतोय प्रवास; व्हिडिओ व्हायरल - Viral Video of Students in Buldhana

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 10:54 PM IST

बुलढाणा Journey of School Students in Buldhana : बुलढाण्यातील सिंदखेडराजा तालुक्यात ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांना वाहनाला लोंबकळत घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास करावा लागतोय. एखादा विद्यार्थी या प्रवासी वाहनातून पडला तर त्याच्या जीवावर देखील बेतू शकतं, असंच काहीसं या दृष्यांकडे पाहून वाटतं. यामुळं ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांच्या जीवाशी नेमकं कोण खेळतंय, असा सवाल उपस्थित होतोय. सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा ते शेंदुर्जन दरम्यानचा हा व्हिडीओ समाज माध्यमांत चांगलाच व्हायरल झालाय. वाहतूक पोलीसही याकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळं एखाद्या विद्यार्थ्याचा जीव गेल्यावर वाहतूक पोलीस जागे होणार आहेत का? असा देखील प्रश्न विचारला जातोय. (Viral Video of Students in Buldhana)  शाळकरी मुलांना शासनाकडून शिक्षणासाठी सोयी उपलब्ध करून दिल्याचा दिंडोरा पिटवला जातो. एस टी महामंडळाकडूनही शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बसेस सोडल्याचं सांगण्यात येत. मात्र बसेसच्या कमतरतेंमुळे शाळकरी मुलांना बसेस उपलब्ध होत नाहीत. यामुळं ग्रामीण भागातून शहरी भागात मुला मुलींना खाजगी वाहतुकीवर अवलंबून राहावं लागतं. तसंच आपला जीव धोक्यात घालावा लागतो. हे कायमस्वरूपी कुठेतरी थांबायला हवं अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जातेय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.