प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य, तर आव्हाडांच्या घरापुढे आंदोलन - Prabhu Shri Ram
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 3, 2024, 10:31 PM IST
शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलंय. "राम शाकाहारी नव्हते, तर ते मांसाहारी होते, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात होते, मग ते शाकाहारी कसे असू शकतात?" असा प्रश्न त्यांनी शिबिरात उपस्थित केलाय. त्यांच्या वक्तव्यावरून राज्यात नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून शिर्डीत दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. “राम शाकाहारी नव्हते, तर ते मांसाहारी होते. त्यांनी 14 वर्षे वनवासात घालवली. मग ते शाकाहारी कसे असतील?" असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. “शिकार करणारे, खाणारे राम आमचे आहेत. राम बहुजनांचे आहेत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.
दुसरीकडे ठाण्यातील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राम मांसाहारी होता असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर ठाण्यात अजितदादा गट आक्रमक झाला. रामाचा फोटो हातात घेत जय श्रीरामच्या घोषणाबाजी करत त्यांनी निषेध नोंदवला. तर जितेंद्र आव्हाड यांच्या घरापासून 200 मीटर अंतरावरच आंदोलकांना अडवून पोलिसांनी ताब्यात घेतलं. जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर देखील जितेंद्र आव्हाड समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हातात बांगडी भरल्याप्रमाणे कोपऱ्यावर आंदोलन केलं असल्याचं जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत पवार म्हणालेत.