Festival on Gurupournima: यावल येथील महर्षी व्यास मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी - जळगाव येथील महर्षी व्यास मुनी मंदिर
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-15812301-764-15812301-1657707845895.jpg)
जळगाव : जिल्ह्यातील यावल येथे महर्षी व्यास मुनीचे (Maharshi Vyas Muni Temple at Jalgaon) एकमेव मंदिर आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे व शासनाच्या निर्बंधामुळे सर्व मंदिरे बंद होती. यावर्षी शासनाने निर्बंध हटविल्याने लाखो भाविकांना गुरुपौर्णिमेनिमित्त (Festival on Gurupournima) महर्षी व्यास मुनींच्या दर्शनाचा लाभ घेता आला. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त यावल येथील व्यास मुनींच्या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात . यावर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त 2100 क्विंटल बुंदीचा प्रसाद , 210 क्विंटल तांदूळाचा महाप्रसाद वाटण्यात आला. तर काही स्वयंसेविकांनी 500 लिटर दुधाचा महाप्रसाद भाविकांसाठी तयार केलेला होता. तसेच,यानिमित्ताने रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासारखे उपक्रम देखील राबविण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्रा सह इतर परराज्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी सहपरिवार येत असतात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST