Jain Muni murder: जैन मुनीच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सकल जैन समाजाचा मोर्चा - Jain Muni murder case
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/20-07-2023/640-480-19049580-thumbnail-16x9-pune.jpg)
पुणे : कर्नाटक राज्यातील चिकोडी ता. हिरेकोडी येथील नंदी पर्वत क्षेत्रावर जैन समाजाचे धर्मगुरू परमपूज्य आचार्य 108 काम कुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात सकल जैन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे. आज सकाळी पुणे, पिंपरी चिंचवड येथील सकल जैन समाजाच्यावतीने या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील ओसवाल बंधू समाज मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने जैन समाजाचे पुरुष तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मोर्चाचे आयोजक म्हणाले की, जैन समाजाचे धर्मगुरू परमपूज्य आचार्य 108 काम कुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या झाली आहे. ही खूप दुःखद घटना आहे. आम्ही अहिंसक असून आम्हाला नेहमी रस्त्यावर उतरावे लागते. आमचे साधू संत यांची सुरक्षा जपली पाहिजे. त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच हिरेकोडी येथील नंदी पर्वत क्षेत्रावर जैन समाजाचे धर्मगुरू परमपूज्य आचार्य 108 काम कुमार नंदी महाराज यांची जी हत्या करण्यात आली आहे. त्या आरोपींना कडक शिक्षा व्हायला पाहिजे.