Irshalwadi Landslide : रात्रीच्या अंधारात इर्शाळवाडीवर झाला घात; माळीणच्या घटनेची झाली आठवण - Raigad News

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 20, 2023, 10:58 PM IST

रायगड : महाराष्ट्राची आजची पहाट अत्यंत दुःखद बातमीने झाली आहे. रायगड परिसरातील इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली. बचावासाठी अग्निशमन दल, एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले. तसेच मुसळधार पावसामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत रात्री उशिरापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. इर्शाळवाडी गावात बचावासाठी गेलेल्या फायरमनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच इर्शाळवाडी या दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेथील परिस्थितीचा आणि सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट बाधित लोकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली. पाहा खास व्हिडिओ..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.