Ram Mandir in Ayodhya : राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात; गर्भगृहाभोवतीचा प्रदक्षिणा मार्गाचा व्हिडिओ पाहा - राम मंदिर बांधकाम व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
अयोध्या (उत्तर प्रदेश) : धार्मिक नगरी अयोध्येतील भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे मंदिराच्या बांधकामाला वेग आला आहे. मंदिराच्या बांधकामाचे व्हिडिओ ट्रस्ट आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने प्रसिद्ध केले जात आहेत. नव्याने प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये मंदिराच्या गर्भगृहाभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग दाखवण्यात आला आहे. हा मार्ग खूप भव्य दिसत आहे. भव्य राम मंदिराच्या निर्मितीमध्ये तळमजल्यावरील बांधकामाचे जवळपास 90% काम पूर्ण झाले आहे. मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. मंदिराचे छत बसवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आता मंदिरात दरवाजे बसवण्याचे काम सुरू आहे. जानेवारी 2024 मध्ये राम मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे. याबाबतची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही.