Narak Chaturdashi : दिवाळीत अभ्यंग स्नानाकरिता उटणे का वापरतात? जाणून घ्या आयुर्वेदिक डॉक्टरकडून - दिवाळी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 23, 2022, 2:10 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

नांदेड उठा उठा दिवाळी आली अभ्यंग स्नानाची वेळ झाली ही हाक अगदी प्रत्येक घरात ऐकू येते. सुगंधी तेल सुगंधी उटणे In Diwali we all put uttane याचा दरवळ शरीराला येतो. लहान मुलं नाराजीने तर मोठी माणसं रीतभात म्हणून उटणे लावून घेतात. पण खरंच उटणे म्हणजे काय, त्याचे फायदे do you know reason behind काय, तर आयुर्वेदात ऋतुनुसार शरीराचा वर्ण कांती उजळविणारे वनस्पती चूर्णाचा वापर स्नानाकरीता सांगितला आहे. थंडीची सुरवात झाली की त्वचा रुक्ष होते. त्यानुसार तेलाने मालीश करणे व उटण्याने स्नान करणे आवश्यक ठरते. तेल अगदी साधे तीळाचे घेणे देखील फायदेशीर आहे. आयुर्वेदात उद्वर्तन म्हणजे एक नित्य दिनचर्येचा भाग आहे. रोज सकाळी व्यायाम अभ्यंग व उटणे लावून स्नान करण्यास सांगितले आहे. कफाचा नाश करणारे, मेद कमी करणारे, त्वचा शिथिल न होऊ देणारे, त्वचा कांतीयुक्त करणारे उटणे आहे. यव, मसूर पीठ यात ऋतुनुसार औषधी वनस्पती चूर्ण मिश्रीत करून हे उटणे वापरण्यास सांगितले आहे. रोगकूपांमधे जमलेला मळ स्वच्छ होणे, त्वचा मऊ, टवटवीत होणे हे या उटण्याव्दारे अपेक्षित आहे. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वानी उटण्याचा वापर केला पाहिजे. उटणे लावून मग स्नान करावे. Narak Chaturdashi . Diwali
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.