Obscene Dance Of Girl: पंचतारांकित हॉटेलमध्ये तरुणीचा अश्लील डान्स; लोकांनी उधळले पैसे - five star hotel in Nagpur
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर : शहरातील एका नामांकित, आलिशान हॉटेलमध्ये डान्स करणाऱ्या मुलींवर काहींनी चक्क पैसे उधळण्याचे काही व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाले आहेत. डान्स करीत असणाऱ्या तरुणी देखील तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करीत होत्या. या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका सोलर कंपनीकडून पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात तरुणींनी तोकडे कपडे परिधान करत अश्लील डान्स केल्याचा प्रकार घडला आहे. त्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांनी अश्लील डान्स त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तो समाज माध्यमांवर वायरल केल्यानंतर हा प्रकार पुढे आला आहे. आता या संदर्भात नागपूर पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते? हे देखील बघण्यासारखे असणार आहे. कारण मध्यंतरी नागपूर जिल्ह्यात अश्याच प्रकारची घटना घडल्यानंतर पोलीस आयुक्तांनी हॉटेल्समध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी नियम घालून दिले होते.